गणेशोत्सवात मुंबईमध्ये अतिरिक्त बेस्ट बसेस धावणार
गणेशोत्सवात मुंबईमध्ये अतिरिक्त बेस्ट बसेस धावणार असल्याची माहिती मिळत आहे. अनेक पर्यटक मुंबईतील गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी मुंबईमध्ये येत असतात. मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते.
सार्वजनिक गणपती आणि गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी गर्दी होत असते. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात मुंबईमध्ये अतिरिक्त बेस्ट बसेस धावणार आहेत. सकाळच्या वेळेत बसेस पुरेशा प्रमाणात असतात मात्र रात्रीच्या वेळी कमी प्रमाणात बसेस असतात.
त्यामुळे गणेशोत्सवातील गर्दीचं प्रमाण लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. भाविक आणि पर्यटकांसाठी बेस्ट प्रशासनाचा हा निर्णय घेतला आहे. 7 ते 16 सप्टेंबरपर्यंत रात्री अतिरिक्त बेस्ट बसेस धावणार आहेत.
7 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान रात्रीच्या वेळेस 24 विशेष बस गाड्यांची सोय करण्यात आली आहे. गिरगाव, लालबाग, परळ, चेंबूर मार्गावरती रात्रीच्या वेळेस विशेष बस चालवण्यात येणार असून मर्या ४, मर्या ७, मर्या ८ तसेच ए-२१, ए -२५, ए-४२, ४४, ६६, ६९ मार्गावर विशेष बस सेवा चालवण्यात येणार आहेत.